कधी पाहिलंय?

कधी पाहिलंय ?

कधी पाहिलंय?
स्वतःची सावली स्वतःपासून,
लांब लांब जाताना ?
कडकत्या उन्हात,
तुम्हाला एकटं सोडून जाताना ?
सावली,
शरीराचा भाग असूनही,
नसल्यासारखीच,
कधीच साथ न सोडणारी,
उजेडात स्पष्टपणे,
सोबत करणारी,
अंधारात हळूच,
गायब होणारी,
तळपत्या सूर्याच्या उन्हात,
हट्टाने पेटून उठलेली,
चंद्राच्या मंद प्रकाशात,
कोमलतेचा प्रत्यय देणारी,
कधी पाहिलंय,
स्वतःची सावली दूर जाताना ?

~@BrotherBheem

Comments

Popular posts from this blog

बस तुम हो

अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज

ताई : चंद शब्द मेरी बहन के लिए।