ती

ती

ती आली आणि...
मला आपलंसं करून गेली
न कळत माझ्या हृदयाच्या
नाजुक तारा छेडून गेली...

तारा छेडताच अंगात,
एक नवी लहर आली....
आणि माझ्यावर,
प्रेमाचा वर्षाव करून गेली...

प्रेमाचा वर्षाव होताच
अंगात एक उर्मी भरून आली
ती नकळत मला
आपलंसं करून गेली...

मला आपलंसं करताना ती हसत होती
माझी सर्व दुःख तेव्हा रडत होती
आणि जणू सांगत होती
प्रत्येकाचा दिवस येतोच...

तो दिवस येताच
मी दुःखात न्हाहून निघालो
दुःख सागरात डुंबत राहिलो
अश्रूंच्या पावसात भिजत चाललो....

अश्रूंच्या पावसात भिजताना
चेहऱ्यावर हास्याची एक लकेर आली
समोर पाहताच पुन्हा
ती उभी दिसली....

तिला पाहताच भान हरपले
तिच्या चेहऱ्यावरच्या हास्यात दुःख विरले
समोर पाहताच पुन्हा तिला
जगण्याची एक नवीन आशा मिळाली मला....

अजूनही त्याच आशेवर जगत आहे
अजून त्याच मुलीवर प्रेम करत आहे
कारण पाहिलं प्रेम हे पाहिलं असतं
त्याला कोणीच विसरू शकत नसतं...

~@BrotherBheem

Comments

Popular posts from this blog

बस तुम हो

अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज

ताई : चंद शब्द मेरी बहन के लिए।